counter

Friday, October 8, 2010

घटस्थापना:- दिवस पहिला

नवरात्रीची पहिली माळ रंग हिरवा , आई जगदंबेच्या कृपेने दि. ८/१०/२०१० ,रोजी रात्री ८ वाजता ," कुलस्वामिनी मानसपूजा "  DVD  व पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला , या कार्यक्रमाला स्वामी समर्थ भक्त परिवाराचे अध्यक्ष श्री. शंकरजी लोके ,व  मुख्य अतिथी  माजी महापौर मुंबई  श्री.महादेवजी  देवळे ,सिने कलाकार  श्री. जयवंत वाडकर, स्वामी समर्थ भक्त श्री  भाऊ रुपजी, लोअर परेलचे नगरसेवक श्री. सुनील  शिंदे, समाजसेवक श्री. बाळाजी खोपडे, व विख्यात वकील श्री.जामदारजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन माणिक.सोस. सार्वजनिक नवरात्रोत्सव  मंडळाचे  कार्याध्यक्ष श्री. मयूर देवळेकर  यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यात  मंडळाचे अध्यक्ष  श्री नथुराम खोपकर  व  मानद सचिव श्री वसंत पाटील, मंडळाचे व्यवस्थापक  श्री. मनोहर कदम ,विनोद नांगरे  आणि सर्व उत्साही कार्यकर्त्याचा सहभाग होता. हा कार्यक्रम स्वामी समर्थ भक्त परिवार मुंबई व माणिक.सोस. सार्वजनिक नवरात्रोत्सव  मंडळ संयुक्त विद्यमाने  भव्यदिमाखाने व उत्साहाने पार पडला. 
 वरील कार्यक्रमास  ज्योतिर्भास्कर श्री. जयंत साळगावकर  विख्यात पार्श्वगायिका वैशाली सामंत ,विख्यात मूर्तिकार श्री. विजय खातू  यांसारख्या  मान्यवरांच्या  शुभेच्छांनी कार्यक्रमास विशेष शोभा आली.















































No comments:

Post a Comment