नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतवर्षात उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात साडे तीन पीठे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरगडची रेणुका व वणीची सप्तशृंगी यांची साडे तीन पिठात गणना होते. नवरात्रात प्रत्येक घरोघरी घटस्थापना करून आपापल्या कुलदेवतेची आराधना केली जाते. सामान्य माणसांना वेळ असेल तर पैसा नसतो व पैसा असेल तर वेळ नसतो. अशा लोकांना या देवतांच्या मूळ ठिकाणी जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही.
लोअर परेल येथे माणिक को. ऑ. सोसायटी येथे गेली सत्तावीस वर्षे नवरात्रोत्सव साजरा केला जातो आहे. आणि वैशिष्ट असे कि हि माणिकची राणी भक्तांच्या मनोकामना नवस पूर्ण करते. जसा "लालबागचा राजा" नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे त्याप्रमाणेच माणिकच्या राणीच्या दर्शनला लांबून लोक येतात व नवस बोलतात आणि फेडतातही. अशी हि माणिकची राणी....
ohh good
ReplyDelete